वाचनाने समृद्ध होते मती,
मिळते आपल्या विकासाला गती.....
महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि विद्यापीठाच्या सूचनेनुसार १ जानेवारी २०२५ ते २५ जानेवारी २०२५ या कालावधीत महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाकडून विद्यार्थ्यांसाठी "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय स्वच्छता, सामूहिक वाचन, ग्रंथप्रदर्शन, पुस्तक परीक्षण स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा इत्यादींचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उस्फुर्त प्रतिसाद दिला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होऊन भविष्यातहि वाचनाची आवड कायम राहील अशी अपेक्षा आहे.