वाचन प्रेरणा दिन
चला वाचूया, स्वतःला घडवूया....
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिन “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा केला जातो.
महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाकडून "वाचन प्रेरणा दिन" १५ ऑक्टोबर २०२४ रोजी साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचन व लेखन कलेची आवड निर्माण व्हावी या हेतूने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन व वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये लेखन व वाचन संस्कृती जोपासत त्यांच्या भविष्यातील यशात हातभार लावणारा हा कार्यक्रम अतिशय यशस्वी ठरला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन उस्फुर्त प्रतिसाद दिला.